ADD SOME TEXT THROUGH CUSTOMIZER
ADD SOME TEXT THROUGH CUSTOMIZER

आपल्या शाळेची वेबसाईट…

संस्थेतील माजी विद्यार्थ्यांचा एक प्रयत्न

सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी हि केवळ एक कल्पनाच असेल नाही का. किंबहुना आपण शाळेत असताना कल्पनात्मक निबंध लिहायचो त्यापैकी एक विषय असावा, असेच काहीसे आपणास वाटले असेल. शाळेचे माजी विद्यार्थी या नात्याने विचार करताना जेव्हा आमच्या मनात हा विचार आला त्यावेळी खरे तर हि एक कल्पनाच होती. आपल्या सारख्या माजी विद्यार्थ्यांना एका सामान धाग्याने जोडून एकत्र आणायचे , त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उभारायचे या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग होता, आधुनिक काळाची ती गरज होती.

सद्यस्तिथीत आपल्या शाळेपासून, मित्रांपासून कुठे तरी दूर देशी विसावलेल्या त्या पाखरांना (विद्यार्थ्यांना ) प्रत्यक्षरित्या शक्य नसल्याने अप्रत्यक्षरित्या आपल्या मनातील कोंदनातून शाळेच्या विशेष आठवणींचा कप्पा उलगडण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

हा प्रयत्नांचा रथ असाच पुढे नेण्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे.

आपले नम्र